Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Wednesday, August 6, 2014

Pik Vima Yojna 2014, Agricultural Insurance Scheme Maharashtra

Pik Vima Yojna 2014, Agricultural Insurance Scheme Maharashtra

Maharashtra Government Agricultural Insurance Scheme 2014 Detail, Important links, Online Application Form & Important links are given below, Read all Details & Download related documents from this page.


राज्य शासनाने यंदा खरीप हंगामासाठी जाहीर केलेल्या राष्ट्रीय पीक विमा योजनेला १६ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ३१ जुलै ही अंतिम मुदत जाहीर करण्यात आली होती. परंतु यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने या योजनेचा अधिकाधिक शेतकर्‍यांना लाभ मिळावा, या हेतूने शासनाने योजनेस २0 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे ज्या शेतकर्‍यांनी अजूनपर्यंत पीक विमा काढलेला नाही, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. 
यासोबतच शासनाने कापूस पिकासाठी शेतकर्‍यांना भरावयाचा विमा हप्ता कमी केला असल्याची माहिती कृषी उपसंचालक अजय राऊत यांनी दिली. ते म्हणाले, यापूर्वी अधिक रक्कम जमा केलेल्या शेतकर्‍यांना उर्वरित रक्कम परत दिली जाणार आहे. ती सर्व रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना सुरक्षा कवच प्रदान करून, शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी राज्यभरात ही योजना राबविली जात आहे. यात गतवर्षी जिल्ह्यातील १३ हजार ६५५ शेतकर्‍यांनी विविध पिकांचा विमा उतरविला होता. त्यासाठी शेतकर्‍यांनी विमा कंपनीकडे एकूण ९७ लाख ३७ हजार ५९५ रुपयांचा विमा हप्ता जमा केला होता. 
त्या मोबदल्यात अतवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या ७ हजार ३0३ शेतकर्‍यांना २ कोटी ९१ लाख ९१ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाल्याची माहिती आहे. ही योजना नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण विभागातील भात, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, तीळ, मूग, उडीद, तूर व कापूस या पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. 
मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना १६ ऑगस्ट २0१४ पर्यंत बँकेत विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..