Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, August 22, 2014

MCVC Now From 9th Class ?

MCVC Now From 9th Class ?

Now As a Professional Education For better carrier options, this Education criteria will be application. Students appearing for this course will get Reservation For higher education.

विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यनिर्मिती व्हावी यासाठी राज्यात यापुढे इयत्ता नववीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक, आयटीआय आणि द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आरक्षण देण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज केली.
व्यावसायिक शिक्षण विषयाला अभ्यासक्रमातील इतर विषयांप्रमाणेच महत्त्व राहणार असून, केंद्र सरकारचे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, केंद्रीय व्यवसाय शिक्षण संस्था; भोपाळ व राज्य शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाने निर्धारित केलेला हा दज्रेदार अभ्यासक्रम असेल. या माध्यमातून नियमित शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक शिक्षण मिळेल, असे शिक्षणमंत्री दर्डा यांनी सांगितले.
इयत्ता नववीपासून शासकीय व खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला राज्यातील ३५0 शासकीय माध्यमिक शाळांना योजनेचा लाभ मिळेल, त्यासाठी केंद्र सरकारचे अर्थसाहाय्य लाभणार आहे. खासगी संस्थांना सदर अभ्यासक्रम स्वबळावर सुरू करता येईल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी संचालक व्यवसाय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली एनएसक्यूएफ कक्ष स्थापन केला जाईल, अशी माहितीही शिक्षणमंत्र्यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..