Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Tuesday, August 5, 2014

MAVIM Recruitment 2014 Bharti - mavimindia.org

MAVIM Recruitment 2014 Bharti - mavimindia.org

MAVIM Recruitment 2014 Bharti

Women Economic Development Corporation Recruitment 2014 Bharti, Mahila Arthik Vikas Mahamandal Bharti 2014, Jobs Vacancy Details & Recruitment Process details are given below.

महिला आर्थिक विकास महामंडळ
(महाराष्‍ट्र शासन अंगीकृत)
संदर्भ जाहिरात क्र.7/2014
महिला आर्थिक विकास महामंडळा तर्फे महाराष्‍ट्र राज्‍य ग्रामीण जीवनोन्‍नती अभियान (MSRLM) अंतर्गत ठाणे, सोलापूर, गोंदिया या जिल्ह्यांसाठी करारतत्वावरील तालुका व Cluster पातळीवर करारतत्वावरील खालील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्‍यात येत आहेत.
अ.
क्र.
पदाचे नाव व ठिकाण
एकूण पद संख्‍या
किमान शैक्षणिक पात्रता
अनुभव
कमाल वयो- मर्यादा
दरमहा एकत्रित मानधन  (रू.)
1
तालुका सनियंत्रण व मुल्यांकन समन्वयक 
ठाणे – ०१
सोलापूर – ०२ गोंदिया – ०१
०४
समाजकार्य, अर्थशात्र, महिलांविषयीचा अभ्यास  विधी, प्रशासन किंवा तत्सम क्षेत्रातील पदव्युतर पदवी.
MS – CIT उतीर्ण
विकासात्मक कार्यक्रमामध्ये सनियंत्रण व मूल्यमापन, DATA Management, MIS या क्षेत्रातील ०३ वर्षाचा अनुभव.
२५ ते ४० वर्षे पर्यंत.
रू.२०,००० /-
2
क्‍लस्‍टर कॉर्डीनेटर 
ठाणे – 07
सोलापूर – 07 गोंदिया – 06
३१
समाजकार्य, अर्थशात्र, महिलांविषयीचा अभ्यास  विधी, प्रशासन किंवा तत्सम क्षेत्रातील पदव्युतर पदवी.
MS – CIT उतीर्ण
महिला समस्याबाबतच्या  कार्याचा किमान 03 वर्षे अनुभव.२५ ते ४० वर्षे पर्यंत.
रू.२०,००० /-
 पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व आवश्यक कागदपत्रे खालील जिल्ह्यांनमध्ये दि.५ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठविण्यात यावा.
१.   जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, १०१, ओम नंदनवन सोसायटी, १ विंग, १ ला मजला, KDMC बस स्टॉप, समोर, कल्याण मुरबाड रोड, कल्याण (पश्चिम), जि. ठाणे.
२.  जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, वाहेकर भवन, कापसे बिल्डिंग च्या समोर शितला माता मंदिर चौक, जि. गोंदिया.
३.  जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा तलाठी व महसूल पतसंस्था इमारत, डी. सी. बँकेच्या बाजूला कलेक्टर क्याम्पस, जि. सोलापूर
यांचेकडे प्राप्त होतील अशा बेताने पाठवावेत.
इमेल द्वारे पाठविलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव या बाबींशी संबंधीत आवश्यक ती कागदपत्रे साक्षांकित करून पाठवावीत. अर्जावर पासपोर्ट आकाराचा स्वाक्षरी केलेला फोटो चिकटवावा, वयोमर्यादा अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास गणण्यात येईल. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट 05 वर्षे शिथिलक्षम राहिल. अर्जासोबत आवश्यक त्या साक्षांकित कागदपत्राच्या प्रती जोडलेल्या नसल्यास तसेच अपूर्ण माहिती असलेल्या आणि विहित दिनांकानंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
पात्रता धारक उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षा होतील, लेखी परीक्षेत विकासाप्रतीचा समज त्यांची गणिती क्षमता तपासली जाईल. तसेच संगणक परीक्षेत MSOFFICE, EXCEL, POWER POINT PRESENTATION यांची प्रत्यक्ष कौशल्य तपासण्यात येतील.
या लेखी व संगणक परीक्षेत उतीर्ण उमेदवारांना तोंडी मुलाखतीसाठी पाचारण करण्यात येईल व अंतिम निवड होईल.
निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम 11 महिन्याचा परिविक्षाधीन कालावधीसाठी करार तत्वावर नियुक्‍ती देण्यात येईल. 11 महिन्याच्या करार कालावधीत काम समाधानकारक असल्यास त्याचा करार पुढे वाढविण्यात येईल. काम असमाधानकारक असल्याचे आढळून आल्या स त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील.
नियुक्‍तीसाठी गैरमार्गाने शिफारस आणणा-या उमेदवारांना अपात्र ठरविण्यातत येईल. इतर सर्व बाबी समान असतील तेव्हा महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. जाहिराती मध्ये नमूद केलेली पदे आवश्यकतेनुसार भरण्याचा अधिकार महामंडळ राखून ठेवित आहे.No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..