Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Tuesday, August 12, 2014

Maharashtra SSC, HSC Online Scholarship Application Form

Maharashtra SSC, HSC Online Scholarship Application Formविद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाइन पद्धतीने शाळा, महाविद्यालयांमधून भरण्याचे स्पष्ट आदेश शासनाने दिले असले तरी, विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी बाहेर पाठविण्याचे प्रकार सुरू आहेत. शिवाय ऑनलाइन अर्ज भरण्याच्या पद्धतीत अनेक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. 
समाजकल्याण विभागातर्फे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची योजना लागू करण्यात आली आहे. २0१३-१४ या शैक्षणिक वर्षात राज्यभरातून १७ लाख ४५ हजार ४४९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरले होते. आता २0१४-१५ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरणे सुरू असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत १६ ऑगस्ट आहे. विद्यार्थ्यांचे हे अर्ज संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाइन पद्धतीने भरून, गटशिक्षणाधिकार्‍यांकडे जमा करावेत, असे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. शिष्यवृत्तीचे अर्ज शाळेतच भरून देण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाकडून वारंवार देण्यात आल्या; मात्र महाविद्यालय आणि शाळा व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करीत असून, विद्यार्थ्यांना खासगी इंटरनेट कॅफेंवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी पाठविले जात आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..