Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Sunday, July 13, 2014

Maharashtra Police 63,000 Police Bharti 2014, 2015

Maharashtra Police 63,000 Police Bharti 2014, 2015




महाराष्ट्राला कधी नक्षलवाद्यांशी सामना करावा लागतो, तर कधी आतंकवादाला तोंड द्यावे लागते. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, लोकसंख्या या पार्श्‍वभूमीवर मोठी पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस दलात करण्यात आली आहे. तरीही पोलिसांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळेच या वर्षासह पुढील पाच वर्षांत ६३ हजार पोलिसांची अतिरिक्त भरती केली जाणार आहे. त्या प्रमाणात अधिकार्‍यांचीही संख्या वाढवली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी दिली.
तुरची (ता. तासगाव) येथे महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या १0९ क्रमांकाच्या तुकडीतील २२५ पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात ते बोलत होते. अकादमीचे संचालक नवल बजाज यावेळी उपस्थित होते.
गृहमंत्री पाटील म्हणाले की, एका बाजूला पोलिसांची संख्या वाढवत असताना गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे. सायबर क्राईम, आर्थिक गुन्हेगारी, बदलणारे कायदे लक्षात घेऊन यापुढच्या काळात पोलीस दलाला अधिक सक्षम बनवणे गरजेचे आहे. यापुढे परिपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी अकादमी प्रयत्नशील राहणार आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतानाच कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना जरब बसेल. चांगले वागणार्‍यांना आपला आधार वाटला पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणार्‍या उपनिरीक्षकांकडून त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नवल बजाज यांनीही मार्गदर्शन केले. विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या उपनिरीक्षकांचा यावेळी गृहमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..