Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Wednesday, June 4, 2014

Maharashtra D.T.Ed. Admission 2014, Application Forms, Lists

Maharashtra D.T.Ed. Admission 2014, Application Forms, Lists

Maharashtra D.T.Ed. Admission 2014

Maharashtra D.T.Ed. (Diploma in Teachers Education) 2014 Admission process is started Now from 2nd june 2014 Application Forms for D.T.Ed. Admission 2014 are available. you can download the Application Forms from given Links, Also get all details about DTEd 2014 at www.resultshub.net, For all updates about D.T.Ed. Admission keep visiting resultshub.net. 

गेल्या चार वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांचा दुष्काळ झेलणार्‍या 'डीटीएड' (डिप्लोमा इन टीचर्स एज्युकेशन) अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांसमोर यंदादेखील मोठे आव्हान आहे. जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावे यासाठी महाविद्यालयांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु जर यंदादेखील विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी संख्येने झाले तर निश्‍चितपणे महाविद्यालयांसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
नागपूर विभागात 'डीटीएड' अभ्यासक्रमाच्या जवळपास १0 हजार जागा आहेत. यात एकट्या नागपुरातच सव्वाचार हजार जागा आहेत. २0१३-१४ या मागील वर्षीच्या प्रवेशप्रक्रियेदरम्यान फारच कमी विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण व संशोधन परिषदेतर्फे उशिरा सुरू झालेल्या प्रवेशप्रक्रियेवर याचे खापर फोडण्यात आले होते.
यंदा मात्र विद्यार्थी दुसर्‍या अभ्यासक्रमांकडे वळू नयेत याकरिता परिषदेकडून प्रवेशप्रक्रिया २ जूनपासूनच सुरू करण्यात आली आहे. अगोदर प्रवेशाचे अर्ज केवळ जिल्हा प्रशिक्षण संस्थांमध्येच मिळायचे. परंतु यंदा मात्र सर्वच 'डीटीएड' महाविद्यालयांना अर्ज विक्रीची सूट देण्यात आली आहे.
अशी स्थिती असली तरी संस्थाचालकांना प्रवेशाची चिंता सतावते आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर रोजगार मिळण्याची हमी नाही. त्यामुळे हजारो रुपये खर्च करून दोन वर्षांचा अभ्यासक्रम करण्याऐवजी विद्यार्थी अन्य अभ्यासक्रमांना प्राधान्य देत आहेत. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..