Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, May 19, 2014

Maharashtra State SSC, HSC Results 2014, Result Date

Maharashtra State SSC, HSC Results 2014, Result Date


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विद्यार्थी व पालकांचे बोर्डाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. यात इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (आयएससीई) बोर्डाने त्यांच्या दहावीच्या निकालाची यापूर्वीच तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) व राज्य शिक्षण मंडळाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या निकालांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. माहिती सूत्रानुसार, आयएससीई बोर्डातर्फे दहावीचे निकाल येत्या २१ मे रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केले जाणार आहे. मात्र सीबीएसई व राज्य शिक्षण मंडळाने अजूनपर्यंत त्यांच्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. तरीही जाणकारांच्या मते, सीबीएसई बारावीचे निकाल येत्या २५ मेपर्यंत जाहीर होऊ शकतात. शिवाय राज्य शिक्षण मंडळाचे निकाल २७ मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे . सीबीएसई बोर्डाने दहावी व बारावी परीक्षांचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षांचे निकाल एकाच दिवशी जाहीर होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. असे न झाल्यास बारावीच्या निकालानंतर पाच दिवसांत दहावीचे निकाल जाहीर होऊ शकतात. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..