Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, April 18, 2014

11th Centralized Admission 2014 Nagpur Region?

11th Centralized Admission 2014 Nagpur Region ?

कला-वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना फायदा
दरम्यान, प्रथमच कला व वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. एरवी या दोन्ही शाखांसाठी केंद्रीभूत प्रक्रिया नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी निरनिराळ्य़ा महाविद्यालयांत अर्ज भरावे लागायचे. परंतु आता ही डोकेदुखी मिटणार आहे. या दोन्ही शाखांच्या मिळून सुमारे २३ हजार जागा आहेत. म्हणजेच यंदा केंद्रीय प्रवेश समितीतर्फे ४२ हजारांवर जागांची प्रवेशप्रक्रिया प्रणाली राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ही एका अर्थाने परीक्षाच राहणार आहे. नागपूर उपराजधानीतील महाविद्यालयांमध्ये पुढील शैक्षणिक सत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीभूत प्रणालीनेच होणार आहेत. परंतु यंदाही 'ऑनलाईन' प्रवेशप्रक्रिया होणार नसल्याची चिन्हे आहेत. केंद्रीय प्रवेश समितीतर्फे गुरुवारी नागपुरातील महाविद्यालयांतील प्राचार्यांची यासंदर्भात बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी बहुतांश प्राचार्यांनी केंद्रीभूत पद्धतीनेच प्रवेश करण्याला संमती दर्शवली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय अकरावी प्रवेश प्रक्रियेत विज्ञान शाखेप्रमाणेच कला आणि वाणिज्य शाखांचाही समावेश करण्याचा निर्णय केंद्रीय प्रवेश समितीद्वारे करण्यात आला आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राचार्यांची बैठक धनवटे नॅशनल कॉलेज येथे पार पडली. दहावीच्या निकालानंतर अकरावीतील विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी उपराजधानीत केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यात द्विलक्षी, विज्ञान शाखेच्या मिळून जवळपास २0 हजारांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भात गुरुवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यंदा 'ऑनलाईन' पद्धतीने प्रवेश होतील अशी चर्चा होती. परंतु सर्व प्रवेश पारंपरिक पद्धतीनेच होणार आहेत. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यास शहरातील एका महाविद्यालयाने मात्र नकार कळविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

1 comment:

Anonymous said...

list kab nikalne wali hai?

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..