Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, October 14, 2013

Vasantrao Naik Maharashtra Details For MPSC Exam 2013 - 2014

Vasantrao Naik Maharashtra Details For MPSC Exam 2013 - 2014

हरित क्रांतीचे महानायक-वसंतराव नाईक


वसंतराव नाईक यांना शालेय वयापासून सामाजिक कामाची आवड होती. वकिली सुरू केल्यानंतर त्यांनी स्वत:च्या गहुली गावातच अनेक सुधारणा केल्या व गाव चर्चेत आणले. मुख्यमंत्रीपदाची तब्बल ११ वर्षांची कारकीर्दही त्यांनी महाराष्ट्राला शेती, उद्योग अशा विविध क्षेत्रात आघाडीवर आणण्यासाठीच खर्च केली. त्यांच्या योगदानातून निर्माण झालेल्या प्रगत महाराष्ट्राचा वसा अद्याप कायम आहे.
माजाला सोबत घेऊन महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य जपण्याचे काम ज्या महानायकाने केले, ते एक सृजनशील, कर्तृत्वसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्व वसंतराव नाईकांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली येथील बंजारा जमातीच्या सधन शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच शिक्षणाचा लळा असलेल्या वसंतरावांनी १९३३ मध्ये नागपूर येथील नीलसिटी हायस्कूलमधून मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण केली. १९३७ मध्ये मॉरिस कॉलेज (सध्याचे वसंतराव नाईक सामाजिक विज्ञान संस्था), नागपूर येथून त्यांनी बीएची पदवी प्राप्त केली.
१९४0ला नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून एलएलबीची पदवी प्राप्त केली. नाईकसाहेबांनी वकिलीची सनद प्राप्त करून घेत, प्रारंभी अमरावतीचे प्रख्यात वकील बॅ. पंजाबराव देशमुख यांच्या बरोबर व नंतर पुसदला वकिली सुरू केली. वकिली सुरू केल्यानंतर सामाजिक कार्यात रस घेऊन ग्रामसुधारणा करण्याच्या कामात त्यांनी लक्ष घातले. समाज शिक्षणाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना प्रशस्तिपत्रही प्राप्त झाले. त्यांच्या प्रयत्नांमुळे व तळमळीमुळे त्यांचे स्वत:चे गांव गहुली हे नमुनेदार बनले.
घेऊन ते राजकीय-सामाजिक कार्य करू लागले. त्यांच्या क्रि याशीलतेमुळे १९४३ मध्ये ते पुसद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले व १९५0 पर्यंत या पदावर राहून समाजकार्य केले. पुढे ज्यांनी महाराष्ट्राचा पाया रोवला त्या यशवंतरावांशी वसंतरावांची जवळीक झाली. यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे दोन सुपुत्र परिस्थितीची आव्हाने खांद्यावर घेऊन महाराष्ट्र घडवायला आणि देशालाही दिशा द्यायला निघाले. त्रैभाषिकातून द्वैभाषिकाकडे आणि द्वैभाषिकाकडून मराठी भाषिक राज्याकडे महाराष्ट्राचा प्रवास सुरू झाला. १९५२ मध्ये मध्य प्रदेश राज्यात वसंतरावांची महसूल उपमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर, द्वैभाषिक मुंबई राज्यात ते सहकार मंत्री झाले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन पेटले होते. दुष्काळ, नापिकी, बेकारी आणि टंचाईने लोकजीवन खंगले होते. आव्हाने चौफेर दंड थोपटत होती. त्यांच्याशी प्रत्येक आघाडीवर सामना करता करता आधुनिक, प्रगत आणि सुसंस्कृत राज्य बनविण्यासाठी वसंतरावांचे योगदान मोठे होते. अखेर १९६0 मध्ये महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि दारिद्रय़ात खितपत
९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईला भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनाला श्री. मुखरे यांच्या समवेत ते मुद्दाम गेले. त्यांच्याच प्रयत्नाने वसंतरावांचा काँग्रेस पक्षात, पर्यायाने राजकारणात प्रवेश झाला. बलाढय़ ब्रिटिश साम्राज्यशाहीला राष्ट्रनिष्ठेचे नेते महात्मा गांधी यांनी ९ ऑगस्ट १९४२च्या याच सभेत जो ‘चले जाव’चा नारा दिला त्या घटनेचा, गांधीजींच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या विचारांचा नाईकसाहेबांवर मोठा प्रभाव पडला. पुसदला परतल्यानंतर काँग्रेसच्या कार्यात रु ची पडलेल्यांना आपल्या पायावर उभे करण्याचे आणि शेकडो वर्षे उपेक्षित असलेल्या सामाजिक घटकांना न्याय व हक्क देण्याचे परमोच्च काम वसंतरावांनी आपल्या पुढील कारकिर्दीत केले.
वच्छ प्रशासन प्रस्थापित करून नव्या आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी त्यांनी केली. १९६४ मध्ये त्यांनी दारूबंदीचे नवे धोरण जाहीर केले, १९६५ला पाकिस्तानने जेव्हा भारतावर स्वारी केली, तेव्हा केंद्राला सर्वाधिक साह्य देऊन महाराष्ट्राची मान उंचावली. रोजगार हमी योजनेंतर्गत ५0 लाख लोकांना काम देऊन-१९७२च्या काळात एक अनोखी किमया त्यांनी केली. शेती आणि शेतीवर प्रेम करणार्‍या वसंतरावांच्या मते इथला सामान्य माणूस हा शेतीवर निर्भर आहे आणि म्हणून त्याचे कल्याण साधले पाहिजे. वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्यासाठी त्यांचा आग्रह होता. शेतकरी शिक्षित व प्रशिक्षित करण्यावर त्यांचा कटाक्ष असायचा. शेतीसोबतच कारखानदारी उभी करून कामगारांच्या हाताला काम व शेतकर्‍यांच्या उत्पादनाला योग्य दाम मिळवून देण्यासाठी साखर कारखान्यांची उभारणी त्यांनी महाराष्ट्रामध्ये केली. काँग्रेसचे एक निष्ठावंत सैनिक म्हणून श्रेष्ठींचा निर्णय शिरोधार्य मानून धीरोदात्त वृत्तीने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. १८ ऑगस्ट १९७९ मध्ये सिंगापूर येथे हृदयविकाराने वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारे वसंतराव यांचे गौरवशाली नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, परंतू त्यांच्या योगदानातून निर्माण झालेला प्रगत महाराष्ट्राचा वसा अद्यापही कायम आहे.
मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वसंतरावांनी धुरा सांभाळली.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..