Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, October 12, 2013

E Suvidha Nagpur University 2013 - 2014 Notifications


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या ई-सुविधेबद्दल असमाधान व्यक्त करण्यात येत आहे. अशास्थितीत त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यात शुल्कवाढ होते की काय, अशी भीती आहे. शुक्रवारी होणार्‍या विद्वत परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शुक्रवारी नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीत महाविद्यालयांना देण्यात येणारे वाढीव संलग्नीकरण, अभ्यासक्रम व विद्यार्थ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात येणार आहेत. त्यातच आता ई-सुविधा मिळविण्यासाठी प्रत्येकी ५0 रुपये अतिरिक्त शुल्क लावण्याची शिफारस विद्वत परिषदेत ठरावाच्या माध्यमातून येणार आहे. ई-सुविधा पुरविण्यासाठी महाविद्यालयांकडून ५0 रुपये शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल करावे, असा ठराव विद्वत परिषदेत मांडण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अर्ज दाखल करणे, निकाल इत्यादीसाठी ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करण्यात येतो. 'एमकेसीएल'कडून ई-सुविधा पुरविण्याचे काम केले जाते. मात्र कंपनीची सुविधा नावापुरतीच आहे. महाविद्यालयातील अपुर्‍या सुविधा, भरमसाट वाढ झालेले शुल्क अन् मूल्यांकनाचा खालावलेला दर्जा यात अगोदरच विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. त्यातच आता अशा आशयाचा प्रस्ताव येत असल्याने प्राधिकरण सदस्य हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी बैठका करतात की महाविद्यालयांच्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..