Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, September 14, 2013

Nagpur University Students Got ATKT Carry On

Nagpur University Students Got ATKT Carry On 

Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University has finally taken the decision to implement ATKT (Allowed to Keep Term).
The varsity has even issued a notification in this regard. The students would be given provisional admission in to the next term after agreeing to the conditions of the examination and submitting signed stamp paper worth ` 100. It may be noted here that engineering students had launched a massive agitation and had even gone on an indefinite strike for the demand of carry on examination. The work of the university had also been affected by these protests, to a great extent. Varsity officials had assured that a solution would be found, however the students continued on their protest.
It is to pacify students that the university finally agreed to give them provisional admissions in the next term. According to the notification, students would be given admission into the fifth semester. They would also be allowed to appear for examination but only after they cleared atleast two third of their examinations of the previous years or semesters. Similarly students would also be given admission into the seventh semester as well after submitting signed 100 Rs. stamp paper.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राजकारण तापविणार्‍या अभियांत्रिकीच्या 'कॅरी ऑन'च्या प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे. विद्वत् परिषदेने शिक्कामोर्तब केलेल्या 'एटीकेटी'च्या (अलाऊड टू कीप टर्म) पर्यायाचे परिपत्रक अखेर विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे पुढील परीक्षेसाठी सध्या पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात प्रवेश होतील आणि यामुळे महाविद्यालय प्रशासनाला फायदाच फायदा होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला १00 रुपयांच्या 'स्टॅम्पपेपर'वर परीक्षेच्या अटींचे पालन करण्यात येईल असे लिहून द्यावे लागणार आहे.
विद्यापीठाशी संलग्न असणार्‍या अभियांत्रिकी महाविद्यालयातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 'कॅरिऑन' मिळावा यासोबत निरनिराळ्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनामुळे विद्यापीठाच्या कामकाजावरदेखील फरक पडला होता. यानंतर विद्यापीठाने नियमांशी तडजोड करून २00१ च्या योजनेनुसार 'एटीकेटी' देण्याचा निर्णय घेतला. सोबतच त्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याची सवलत देण्यात आली असल्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार याबाबतची अधिसूचना लवकरच काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तब्बल दहा दिवसांच्या कालावधीनंतर विद्यापीठाने रोजी संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयाचा फायदा बी.आर्क., बीटेक, बी.ई.च्या हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे. (प्रतिनिधी) स्टॅम्प पेपरवर हमी परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना पाचव्या सेमिस्टरमध्ये प्रवेश देण्यात येईल. मात्र, त्या सेमिस्टरची परीक्षा देण्यासाठी अगोदरच्या वर्षांतील दोन तृतीयांश विषय काढावे लागणार आहे. अशाप्रकारे सातव्या सेमिस्टरमध्येही प्रवेश मिळेल, यासाठी विद्यार्थ्यांना १00 रुपयांचा स्टॅम्प पेपरवर महाविद्यालयाला अटींचे पालन करू, असे लिहून द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे ही सुविधा घेणार्‍या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची असेल, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. 'नॉन क्रेडिट बेस'ची अखेरची संधी वर्ष अखेरची संधी
प्रथम वर्ष उन्हाळी परीक्षा २0१४
तिसरी सेमिस्टर हिवाळी परीक्षा २0१४
चतुर्थ सेमिस्टर उन्हाळी परीक्षा २0१५
पाचवे सेमिस्टर हिवाळी परीक्षा २0१५
सहावे सेमिस्टर उन्हाळी परीक्षा २0१६
सातवे सेमिस्टर हिवाळी परीक्षा २0१६
आठवे सेमिस्टर उन्हाळी परीक्षा २0१७
नववे सेमिस्टर हिवाळी परीक्षा २0१७
दहावे सेमिस्टर उन्हाळी परीक्षा २0१८

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..