Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Thursday, June 6, 2013

Maharashtra SSC 2013 results on 7th June 2013

Maharashtra SSC 2013 results on 7th June 2013


THE results of Secondary School Certificate (SSC/Class 10) examination will be declared on June 7 at 1 pm. Maharashtra Slate Board of Secondary and Higher Secondary Education had conducted the examination. Results will be available on-line on the website- mahrcsuit.nic.in & www.resultshub.net after 1 pm. The print-out of the details can be taken out on the same date but the mark-sheets will be distributed to schools on Saturday June 15 at 11 am.

 माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांची गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप शनिवारी, १५ जून रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार असून शाळेचे प्रशासन दुपारी ३ वाजता या गुणपत्रिकांचे विद्यार्थ्यांना वाटप करतील. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण जाहीर करण्यात येणार आहेत. विषयनिहाय गुणांची प्रत (प्रिंट आऊट) विद्यार्थ्यांना घेता येईल.
दहावीच्या ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांना मूळ गुणपत्रिका मिळाल्यावर २५ जूनपर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य आहे. इंटरनेटवरील गुणपत्रिकेच्या आधारे गुणपडताळणीसाठी केलेले अर्ज अवैध ठरविण्यात येतील. ऑक्टोबर २0१३ मध्ये घेण्यात येणार्‍या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी नियमित शुल्कासह मंगळवार २५ जूनपर्यंत व विलंब शुल्कासह २९ जूनपर्यंत माध्यमिक शाळांकडे फॉर्म सादर करावेत. सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना क्लास इम्प्रूव्हमेंट योजनेअंतर्गत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी २00८ पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार मार्च २0१३ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंना ऑक्टोबर २0१३ आणि मार्च २0१४ अशा दोन्ही संधी उपलब्ध राहतील. परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास उत्तरपत्रिकेची छायाप्रत देण्याची सुविधा उपलब्ध आहे. उत्तरपत्रिकेच्या छाया प्रतीच्या मागणीसाठी विद्यार्थी ऑनलाइन निकालानंतर ७ ते २७ जूनपर्यंंत अर्ज करू शकतील. मार्च २0१३ च्या परीक्षेपासून उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक असून छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांंना अर्ज करणे आवश्यक असेल.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..